मुंबई कबड्डी भुषण २००८" पुरस्कार ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू श्री. राजाराम पवार यांना जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर २००७-०८ या वर्षाकरिता कबड्डी क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, खेळाडू, पंच, कार्यकर्ते व कबड्डी खेळासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या क्रीडा संस्था यांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली.
मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २००८ रोजी सायं. ५.०० वाजता राज्यसभेचे खासदार व महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री. भारतकुमार राऊत, मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ, माजी महापौर श्री. महादेव देवळे, व संघटनेचे अध्यक्ष आमदार श्री. भाई जगताप यांच्या उपस्थितीत सर्व पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यार येईल. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व खेळाडूंना रोख रक्कम देऊन गौरवमुर्तींचा सन्मान करण्यार येईल. या गुणवंत-यशवंत विजेत्यांना शुभेच्छा देण्याकरिता मुंबईतील आजी-माजी कबड्डी खेळाडू, कार्यकर्ते, व क्रीडाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती एका पत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो. च्या वतीने करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:
|