महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशन

आयोजित ९ वा कबड्डी दिन सोहळा

 

कबड्डीमहषीर् बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र व मुंबई शहर कबड्डी संघटनेने ९ वा  कबड्डी दिन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी इतर पुरस्कांराबरोबरच राज्यातील गुणी ज्युनियर व सब ज्युनियर खेळाडूंचा शिष्यवृत्तीने उत्साह वाढवला जाईल. जलसंपदा मंत्री व राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, महापौर डॉ. शुभा राऊळ व राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस मोहन भावसार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.

मुंबई उपनगरच्या नीलेश शिंदे व रिबेका गवारे यांना अनुक्रमे मधु पाटील व अरूणा साटम पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रभादेवीच्या रवींद नाट्यमंदीरात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ प्रशिक्षकाच्या पुरस्काराने शेखर शेट्टी यांना गौरवण्यात येईल.

पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:

दिवंगत मधु पाटील पुरस्कार (पुरूष) : निलेश शिंदे (मुंबई उपनगर).

दिवंगत अरूणा साटम पुरस्कार (महिला) : रिबेका गवारे (मुंबई उपनगर).

आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार

पुरूष : पंकज शिरसाट (अहमदनगर), नितीन घुले (पुणे).

महिला : रिबेका गवारे (मुंबई उपनगर), दीपिका जोसेफ, शीतल मारणे व किशोरी शिंदे (सर्व पुणे).

शिष्यवृत्तीधारक ज्युनियर व सब ज्युनियर खेळाडू :

ज्युनियर मुले- क्रमित पाटील (रायगड), संतोष आवळे (सांगली), प्रशांत चव्हाण (कोल्हापूर) व महेश जोगडे (रायगड).

ज्युनियर मुली- आशा शर्मा (पुणे), ज्योती देवकर (सांगली), शीतल बावडेकर (मुंबई शहर) व कोमल चव्हाण (सातारा).

सब ज्युनियर मुले- अनिल उन्हाळे (कोल्हापूर), दिनेश पाटील (ठाणे), अजय शिंदे (मुंबई उपनगर) व चंदकांत घाणेकर (रत्नागिरी).

सब ज्युनियर मुली- स्नेहल शिंदे (पुणे), पूजा किणी (मुंबई उपनगर), रूबिना शेख (सातारा) व रक्षा नारकर (मुंबई शहर).

ज्येष्ठ प्रशिक्षक : शेखर शेट्टी (मुंबई शहर).

ज्येष्ठ कार्यकर्ता- दौलतराव शिंदे (नाशिक) व प्रल्हाद शेरकर (उस्मानाबाद).

ज्येष्ठ महिला खेळाडू- नलिनी फडणीस (मुंबई शहर), सुहास केळकर अग्निहोत्री (मुंबई शहर).

ज्येष्ठ पुरूष खेळाडू- चंदकांत पोळेकर (पुणे) व रत्नाकर शेट्टी (मुंबई शहर).

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार- अनिल जोशी (वार्ताहार).

दीर्घकाळ पंचसेवा- दत्ता गायकवाड (सोलापूर) व रामचंद पाटील (मुंबई शहर).

आंतरराष्ट्रीय पंच : रामचंद पाटील व शुभांगी पुजारी (मुंबई शहर).

राज्य स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद : पुणे जिल्हा.

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक (वैयक्तिक संस्था)- जळगाव जिल्हा.

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक (व्यावसायिक)-पिंपरी चिंचवड महापालिका.

कार्यरत जिल्हा-अहमदनगर.

कबड्डी स्पर्धा सातत्य आयोजक संस्था- अंबाबाई तालिम संस्था, मिरज.

 
९ व्या  कबड्डी दिनाच्या पुर्वतयारीसंबंधी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप व सोबत इतर पदाधिकारी.
 
नोंदणी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम - १९५०